अपघात विमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

By admin | Published: July 23, 2014 11:51 PM2014-07-23T23:51:06+5:302014-07-23T23:51:06+5:30

शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला

Farmers are deprived of the benefits of accident insurance scheme | अपघात विमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

अपघात विमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

Next

महागाव : शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाने स्वत:च्या तिजोरीतून आतपर्यंत कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु महसूल विभागाच्या उदासीनतेचा फायदा विमा कंपन्यांनी उचलला आहे.
शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती व अपघातामुळे मृत्यू झाला किंवा कायम अपंगत्व आले तर मदत मिळावी म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांंना अपघात विमा संरक्षण देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. महसूल विभागाची अनास्था हेरुन विमा कंपन्यांनी या योजनेतून लाभ लाटला आहे.
प्रस्ताव सादर केल्यानंतर अनावश्यक त्रुट्या दाखवीत अनेक मृत शेतकऱ्यांना तथा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागावर सोपविली गेली आहे. परंतु महसूल आणि कृषी विभाग या योजनेविषयी पाहिजे तसा सजग नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनी स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. जिल्ह्यात वर्षभरात जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
या शेतकऱ्यांच्या विमा दाव्याचे प्रकरण कंपनीकडे सादर केले. मात्र या प्रस्तावांची दखल घेतली नाही. १५ आॅगस्ट २००७ पासून आतापर्यंत शेकडो प्रकरणे दाखल करण्यात आली. मात्र अनेक प्रकरणे नामंजूर झाली आहे. अमरावती विभागात या योजनेसाठी शासनाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र या योजनेतील गौडबंगालामुळे पात्र शेतकरी कुटुंब विम्यापासून वंचित आहे. अनेक लाभार्थ्यांनी पीक विम्यासाठी प्रस्ताव दाखल केले. विविध कागदपत्र गोळा केली. मात्र विमा कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळे या लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही विमा कंपन्या या शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून लाभापासून वंचित ठेवत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers are deprived of the benefits of accident insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.