प्रक्रिया उद्योग नसल्यानेच शेतकऱ्यांचे हाल

By admin | Published: May 29, 2016 02:34 AM2016-05-29T02:34:02+5:302016-05-29T02:34:02+5:30

ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले.

The farmers are in the process of not being a business | प्रक्रिया उद्योग नसल्यानेच शेतकऱ्यांचे हाल

प्रक्रिया उद्योग नसल्यानेच शेतकऱ्यांचे हाल

Next

नंदकुमार खैरे : गुरूदेव सेवा मंडळाची सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना
पुसद : ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले.
श्री गुरूदेव सेवा मंडळ पुसद तालुका शाखेतर्फे येथील देशमुख नगरातील प्रार्थनास्थळी साप्ताहिक सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना उत्साहात पार पडली. या प्रसंगी ‘राष्ट्रसंतांची ग्रामगीता व सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व’ या विषयावर प्रा. खैरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी सर्व प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मौन प्रार्थना, सर्वधर्मिय सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, शांतीपाठ, सामूहिक नमस्कार, राष्ट्रवंदना व जयघोष आदी कार्यक्रम पार पडले. प्रा. खैरे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत शेतकऱ्यांची समस्या मांडताना ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे’ असे वर्णन केले आहे. खेड्यातील लोकांनी कारखानदारी उभी करण्याचे शिक्षण घेतले पाहिेजे. शेतकऱ्यांचा कच्चा माल पक्का होण्याची प्रक्रिया खेडेगावातच झाली पाहिजे. नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, भाऊ सडमाके, राजू पुरी, डॉ. संजय गुंबळे, बाबासाहेब वाघमारे, ज्ञानेश्वर ताकतोडे, प्रभाकर चव्हाण, पिंटू सडमाके, ओम उचाडे, नरेश ढाले, गजानन जाधव, नारायण कवठकर, अनिल अस्वार, महिला प्रतिनिधी छाया लामणे, चंद्रभागा लामणे, डॉ. सुलभा पिंजरकर, ताई पुरी, ताई वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The farmers are in the process of not being a business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.