विमा अनुदानासाठी शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:20 AM2018-08-15T00:20:36+5:302018-08-15T00:21:21+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पीक विमा अनुदानाबाबत अनेक शेतकºयांनी तक्रारी केल्यानंतर येथील रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आ) आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात रिपाइंने सोमवारी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.
पुसद तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुसद शाखा वगळता इतर राष्ट्रीयकृत बँकांनी महिनाभरापूर्वीच शेतकºयांना खरीप पीक विमा अनुदान वाटप केले. मात्र शेतकऱ्यांची बॅक असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद शाखेने अद्यापही अनुदान वाटप केलेले नाही. २०१७-१८ चा सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा अनुदान अद्यापही जिल्हा बँकेने वाटप केलेले नाही.
तालुक्यातील शेतकरी जिल्हा बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे आणखी संकटात सापडला आहे. त्यामुळे बँकेविरुद्ध असंतोष खदखदत आहे. खरीप पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाइंने दिला आहे.
निवेदनावर बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, प्रकाश धुळे, प्रकाश खंडागळे, गौतम रणवीर, दिलीप धुळे, राजेश ढोले, पंडित बैस, वामन भालेराव, सुधीर कांबळे, संतोष डोंगरे, वसंता वाघमारे, बाबूलाल राठोड आदींच्या स्वाक्षºया आहेत.
जिल्हा बँकेवर रोष
तालुक्यातील इतर राष्टÑीयकृत बँकांच्या शाखांनी खरीप पीक विम्याचे अनुदान शेतकºयांना मागील महिन्यातच अदा केले आहे. परंतु खास शेतकºयांचीच बँक असलेल्या जिल्हा बँकेच्या पुसद शाखेला अद्यापही अनुदान वाटप करता आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये जिल्हा बँकेविरुद्ध रोष आहे.