कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:14+5:30

पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण्यात आल्या होत्या.

Farmers' buzzer for buying cotton | कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

Next
ठळक मुद्देअर्धा तास वाहतूक खोळंबली : गाड्या स्वीकारण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामानात झालेल्या बदलाने पणन महासंघाने कापूस खरेदी थांबविली आहे. यामुळे कापूस विक्रिकरिता आणणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकरी दोन दिवस मुक्कामी राहिले. गुरूवारी वातावरण स्वच्छ झाल्यानंतरही खरेदी सुरू झाली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्काजाम केला. अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. अखेर सभापती आणि एपीआयच्या पुढाकाराने गुंता सुटला. गाड्या स्वीकारण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण्यात आल्या होत्या.
कापूस विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आलेल्या वाहनांना गुरूवारी थांबविण्यात आले होते. सलग तिसऱ्या दिवशीही कापसाची वाहने थांबलेली होती. कापूस खरेदीसाठी पणन महासंघ तयार नसल्याने दुपारनंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीपुढे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकरी रस्त्यावर बसले होते. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली.
बाजार समिती सभापती रवींद्र ढोक यांनी या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. पणन संचालकांसह इतरांशी संपर्क साधला. त्यांनी वाहन घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर वाहन सोडण्यासाठी टोकन पुरविण्यात आले. या आश्वासनानंतर शेतकºयांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले.

बाजार समितीने केली भोजनाची व्यवस्था
बाजार समितीमध्ये सोमवारी ३५० वाहने आली होती. मंगळवारी या ठिकाणी ८० वाहने आली. या शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून मुक्काम झाला. या कालावधीत बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. याबाबत शेतकरी शंकर पवार, बाबूसिंग राठोड, अरविंद चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Farmers' buzzer for buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.