कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:39 PM2019-02-18T21:39:46+5:302019-02-18T21:40:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली ...

Farmers' cheating without debt forgiveness | कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांची फसवणूक

Next
ठळक मुद्देनाना पटोले : सावनेर येथे शेतकरी मेळावा, नेत्र तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : भाजप सरकारने शेतकऱ्यांना सन २००४ प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली नाही. यातून शेतकºयांची फसवणूक केली आहे. दुसरीकडे शेतमालाला आश्वासनाप्रमाणे भाव दिला नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ झाली आहे. अशा सत्ताधाºयांना शेतकऱ्यांनी धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
तालुक्यातील सावनेर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस, तूर, सोयाबीन या परंपरागत पिकाऐवजी आता फळबागांकडे वळा. त्यासाठी धरणाचे पाणी शेतीला मिळालेच पाहिजे अशी खंबीर भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन माजीमंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहो अशी ग्वाही दिली. शास्त्रीय, वैज्ञानिक, आधुनिक शेती करावी. शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी असल्याचे बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सांगितले.
मनिष पाटील, देवानंद पवार यांनी समयोचित विचार मांडले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, प्रवीण कोकाटे, मिलिंद इंगोले, अरविंद वाढोणकर, नंदकुमार गांधी, रमेश कन्नाके, अशोक पाटील, संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, नाना पटोले, देवानंद पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ.एन.बी.पाटील यांनी संत्रा व मोसंबी पिकाबाबत तर डॉ. मिलिंद गिरी यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनावर शेतकºयांना माहिती दिली. यावेळी किरण कुमरे यांच्या पुढाकाराने झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. बाजार समितीचे उपसभापती पुरुषोत्तम निम्रड, संचालक राजेंद्र महाजन, गोवर्धन वाघमारे, निश्चल बोभाटे, नामदेवराव फटींग, राजेंद्र तेलंग, सचिव सुजित चल्लावार आदी उपस्थित होते. सभेचे संचालन राजेश काळे, प्रास्ताविक अंकुश रोहणकर, आभार किरण कुमरे यांनी मानले.
काँग्रेसचे दोन गट एकाच मंचावर
राळेगाव तालुक्यात काँग्रेसचे दोन गट आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडीचे राजकरण सुरू आहे. मात्र सावनेर येथील मेळाव्यात अनेका वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच प्रा.वसंतराव पुरके, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर व बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात दोन्ही गट सामिल झाले.
काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते यानिमित्ताने मतभेद विसरून एकाच मंचावर आले होते. मात्र हे नेते मनाने एकत्र येतील का असा प्रश्न कार्यकर्ते व मतदारांत उपस्थित होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी वसंतराव पुरकेंना राजी केल्याची आतील गोटात चर्चा आहे.

Web Title: Farmers' cheating without debt forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.