बियाणे निकृष्ट निघाल्याची शेतकऱ्यांची तक्रार
By admin | Published: March 27, 2016 02:23 AM2016-03-27T02:23:28+5:302016-03-27T02:23:28+5:30
टमाटरचे बियाणे निकृष्ट निघाल्याने तालुक्यातील सवना आणि अंबोडा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून याबाबत महागाव कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली.
महागाव : टमाटरचे बियाणे निकृष्ट निघाल्याने तालुक्यातील सवना आणि अंबोडा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून याबाबत महागाव कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली.
सवना येथील शेतकरी मधुकर टेकाडे, पंजाब हुडेकर, साहेबराव भोयर, लक्ष्मणीबाई पारवेकर, गजानन सावंत, अंबोडा येथील बबन हेडे, दिगांबर हेडे, अतुल हेडे, नंदकिशोर हेडे, सतीश हेडे, लक्ष्मण पाटे, माळकिन्ही येथील अमरसिंग चव्हाण यांनी एका कंपनीचे टमाटरचे बियाणे महागावच्या कृषी केंद्रातून खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची लागवड करण्यात आली. रोप तयार झाले. परंतु काही दिवसातच पाने गुंडाळून झाडे मारु लागली.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी तक्रार तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांच्याकडे केली आहे. सदर बियाणे तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्याचे रणवीर यांनी सांगितले. या अहवालावर कारवाई केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)