शेतकरी विविध योजनांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:46+5:302021-09-03T04:44:46+5:30
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनांचा लाभ द्या पांढरकवडा : तालुक्यात बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा बेरोजगार युवकांना ...
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनांचा लाभ द्या
पांढरकवडा : तालुक्यात बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कमी व्याजदर व कमी कागदपत्रे लागणारे मुद्रा लोन उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वनहक्क पट्टे वाटप करण्याची मागणी
पांढरकवडा : शासनाकडून वनहक कायद्यान्वये वनजमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. मात्र अजूनही काही ठिकाणी कागदपत्रांच्या अटींमुळे अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्क पट्ट्यापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने वनहक्क पट्टे वाटप करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महामार्गावर साफसफाईस सुरुवात
पांढरकवडा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर दुतर्फा अनेक झाडेझुडपे वाढून रस्ते अरुंद बनले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत या झाडाझुडपांची कटाई करून साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.