शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:19+5:30
सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहे. हा पाऊस मान्सूनचा नसल्याने मध्ये मोठा खंड आहे. अशा स्थितीत झालेली टोबणी उलटण्याचा धोका आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्या, असा सल्ला
पेरणी करण्यासाठी किमान १०० मिमी पावसाची गरज असते. १०० मिमी पाऊस बरसल्यानंतर केलेली पेरणी पावसाचा विलंब झाला तरी सुरक्षित अंकुरते. मात्र जिल्ह्यात जेमतेम १६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत पावसाचा खंड सांगितला आहे. या काळात उन तापणार आहे. यामुळे अंकुरलेले बियाणे अपुऱ्या पावसाने करपण्याचा अधिक धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.
सध्याचा पाऊस मान्सूनपूर्व आहे. चक्रीवादळाने त्यात भर घातली. हा पाऊस पेरणीचा समजून काहींनी पेरणीला सुरूवात केली. मुळात हा पाऊस मान्सूनचा नाही. त्याला १७ जूनपर्यंत विलंब आहे. तूर्त शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.
- पंकज बर्डे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ
मान्सूनपूर्व कपाशीची लागवड शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरू शकते. पावसाचा खंड असल्याने पेरणी उलटू शकते. यामुळे तूर्त शेतकºयांनी पेरणी थांबवावी. जांभुळवाई करून १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.
- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक (संशोधन) केव्हीके, यवतमाळ.
वेधशाळेने ११ जूनपर्यंत पावसात खंड सांगितला आहे. शेतशिवारात १६ मिमी पावसाची नोंद आहे. अशा स्थितीत पेरणी करणे धोक्याचे आहे. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.
- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ