कोळसाखाण विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:18+5:302021-07-31T04:42:18+5:30
* एकमुस्त शेती घेण्याची मागणी मुकुटबन : येथील मे.बी.एस.इस्पात कोळसा खाण काही दिवसापूर्वीपासून सुरू आहे. या कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या ...
* एकमुस्त शेती घेण्याची मागणी
मुकुटबन : येथील मे.बी.एस.इस्पात कोळसा खाण काही दिवसापूर्वीपासून सुरू आहे. या कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कमी दराने घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत माजी खासदार हंसराज अहिर व आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्याशी शेतकऱ्यांनी येथील राजराजेश्वर मंदिरात चर्चा केली.
या कोळसा खाणीच्या मालकांनी एक-एक शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून कमी दरान शेती घेणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात येताच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी, २५ लाख रुपये एकरप्रमाणे शेती घ्यावी, ओव्हरलोड वाहतूक थांबवावी, यासाठी शेतकरी एकवटले आहे. या सभेला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह सरपंच मीना आरमुरवार, सतीश नाकले, अनिल कुंटावार, लक्ष्मी बच्चेवार, दिनकर पावडे, पिदुरकर, बबिता मुद्दमवार, चक्रधर तीर्थगिरीकर, गिरीजाशंकर टिपले, रवि पुल्लीवार, जिन्नावार, रुईकोट परिसरातील शेतकरी उपस्थित होते.