वीज कंपनीवर शेतकºयांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:29 PM2017-10-31T23:29:57+5:302017-10-31T23:31:17+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याविरोधात संताप व्यक्त करत शेतकरी कापसाचे गाठोडे घेऊन विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकले.
अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देता-देता शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहे. बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. जेमतेम हाती आलेल्या कापसाचा लिलावही सुरू झालेला नाही. व्यापाºयांना कवडीमोल दरात पांढरे सोने विकावे लागत आहे. अशातच विद्युत कंपनीने कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय वीज कापणे सुरू केले आहे.
तालुक्यातील टिटवी, वासरी, मांडवा, हिवरधरा आदी गावातील वीज ग्राहक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. गोपाल उमरे, प्रमोद गंडे, राजू पेंदोर, जिजाबाई निबुदे, पुंडलिक गुरनुले, रमेश गुरनुले, महादेव बारेकर यांच्या शेतातील वीज कापण्यात आली. सध्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे. वीज तोडल्याने उत्पादन आणखी घटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. कापसाचे गाठोडे डोक्यावर घेऊनच शेतकरी याठिकाणी दाखल झाले होते. यावेळी देवानंद पवार, शैलेश इंगोले, प्रशांत धांदे, मनोज ढगले, प्रशांत मस्के, सैयद रफिक, सैयद शब्बू आदी उपस्थित होते.