शेतकरी संकटात; हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली; तब्बल १,२३० घरांची पडझड; आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:57 PM2024-09-04T17:57:30+5:302024-09-04T17:58:02+5:30

पुसदमध्ये १५३ नागरिकांचे स्थलांतर : वाहतूक विस्कळीत, पिके सडून जाण्याची भीती; पुसद आणि दिग्रसमध्ये अतिवृष्टी आकपुरी नाल्यात एक वाहून गेला यवतमाळ शहरात वीज कोसळली

Farmers in distress; Thousands of hectares under water; As many as 1,230 houses collapsed; Two more days of orange alert | शेतकरी संकटात; हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली; तब्बल १,२३० घरांची पडझड; आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट

Farmers in distress; Thousands of hectares under water; As many as 1,230 houses collapsed; Two more days of orange alert

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
सोमवारी पोळ्याच्या दिवशीही यवतमाळसह भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पुसद तालुक्यात जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे वणीसह झरी तालुक्यातील काही झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजविला असून, जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पूस नदीला आलेल्या पुरात एक इसम वाहून गेला. नदी काठावरील १५३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे १२१ जनावरे दगावली असून, १२३० घरांची अंशतः तर ३० घरांची पूर्णतः पडझाड झाली आहे. चार कोटी ६० लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


तालुक्यातील पुसद, खंडाळा, बेलोरा, शेवाळपिंप्री, ब्राह्वाणगाव, जांबबाजार, वरुड, गौळ बु, बोरी खु, आदी नऊ महसूल मंडळात मागील दोन दिवस सतत अतिवृष्टी झाली असून नदीकाठावरील जमीन खरडून गेली आहे. यात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, तीळ, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूस धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळल्याने पूस नदीला पूर येऊन पुसद-दिग्रस मार्गावरील पुलावरून पाणी वाहिल्याने रविवारी तब्बल पाच तास वाहतूक बंद होती. तर या पुलाचा काही भाग कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. नदीकाठावरील तब्चल १४३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तब्बल दोन कोटी ५० लाख रुपयांच्या पुलांचे तर विद्युत विभागांतर्गत तब्बल दोन कोटी १० लाख रुपयांच्या विद्युत खांब व ट्रान्सफार्मर आदी एकूण चार कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वडसद गावाला पुराचा वेढा पडल्याची माहिती मिळताच आमदार इंद्रनील नाईक यांनी तातडीने वडसद गाठले यवतमाळ तालुक्यातील आकपुरीमध्ये नाल्याच्या पुरात सुरेश गावटे हा ४० वर्षीय इसम वाहून गेला. तर यवतमाळ शहरात वीज कोसळली. यात काही घरांचे नुकसान झाले.


"पुसद शहर व तालुक्यात मागील दोन दिवस अतिवृष्टी आली. यात मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे कृषी सहायक, तलाठी य ग्रामसेवकांमार्फत पंचनामे करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडे अहवाल सादर करून मदतीची मागणी करण्यात येईल." 
- महादेव जोस्वर, तहसीलदार पुसद


शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा - पालकमंत्री 
यवतमाळ :
जिल्ह्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. यात १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश पालकंमत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अधिकारी उपस्थित होते. १ आणि २ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिग्रस व आर्णी तालुक्यांतील प्रत्येकी २५ याप्रमाणे ५० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. 


स्थलांतरीत नागरिकांची संख्या २१% इतकी आहे. पूरस्थितीत एका व्यक्तीचा जीव गेला. तसेच, सात जनावरे दगावली. जिल्हह्यात २८८ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक सर्वे आहे. यात सर्वाधिक १०५ घरांचे नुकसान बाभुळगाव तालुक्यात झाले. दिग्रस ६५, घाटंजी ४६, कळंब ४३ तर केळापूर, वणी, नेर, मारेगाव, झरी तालुक्यांतही काही घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तुरीचे देखील नुकसान झाले आहे. नजरअंदाजे या तालुक्यांमधील १३३ गावांमध्ये १८ हजार २१६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक नुकसान आर्णी तालुक्यात पाच हजार ७६९, तर दिग्रस तालुक्यात पाच हजार १६० हेक्टरचे आहे. दारव्हा तालुका १३०, कळंब १९९, झरी १७३८, घाटंजी ३ हजार २६०, केळापूर १०८५, तर बाभूळगाव तालुक्यात १ हजार ७५ हेक्टस्वर नुकसान झाले आहे. 


नदी काठावरील शेतपिकांचे मोठे नुकसान वणी/मारेगाव : 
वणी उपविभागात शनिवारी दि. ३१ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. वर्धा-पैनगंगा नदी काठावरील शेतपिकांना मोठा फटका बसला, वणी तालुक्यातील २०० हेक्टरवरील पिकात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 


वणी व मारेगाव तालुक्यात ३१ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही तासांत, नदी-नाले दूधडी भरून वाहू लागले. ग्रामीण भागातील अनेक रस्ते पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले होते. वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भा नद्यांना पूर आला, पुराचे पाणी नदी काठावरील शेतात शिरले. त्यामुळे कापूस, सोयाबीन व तूर पिकाला चांगलाच फटका बसला, मारेगाव तालुक्यातील कुंभा, जळका, मार्डी, मच्छिंद्रा, मारेगाव या भागांत २४ तासांत ७० मिमी पाऊस कोसळला. 


तालुक्यातील घौडदरा येथील २ आणि जळकापोड येथील १ घराची भिंत पडून नुकसान झाले. दुर्गाडा येथील २५ सागवान झाडे पहली असल्याचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. तालुक्यात इतर घरांची पडढ़ाड आणि शेताचे नुकसान झाले असून, पंचनामे सुरू आहेत. नुकसानीची अंतिम आकडेवारी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समौर येईल, अशी माहिती तहसीलदार उत्तम नीलावाड यांनी दिली.


अद्यापही शेतात पाणी साचून 
वणी तालुक्यातील नायगाव, सावंगी, बोरी, मूर्ती, कोलगाव या गावांतील नदी काठावरील शेतात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले. अद्यापही शेतात पाणी साचून आहे. त्यामुळे पिके सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Farmers in distress; Thousands of hectares under water; As many as 1,230 houses collapsed; Two more days of orange alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.