भारतात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:26 PM2018-05-09T22:26:32+5:302018-05-09T22:26:32+5:30
भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, अशी खंत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.
परिवर्तन यात्रेनिमत्ति येथे झालेल्या सभेत वामन मेश्राम अध्यक्षस्थानाहून संबोधित करत होते. प्रसंगी मंचावर हजरत मौलाना मो. सादिक नदवी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. मनोहर देशमुख आठवले यांची उपस्थिती होती.
वामन मेश्राम पुढे म्हणाले, ईव्हीएममध्ये चोरी होते, घोटाळा होतो असे सगळेच म्हणतात. मात्र ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याची तक्रार सर्वोच्च न्यायालयात केवळ मी एकट्याने केली. या खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागला. मात्र अजूनही निवडणूक आयोग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.
पत्रकार अरुण राऊत, सुनीता राऊत, अंकुश राऊत, राजू धोटे यांच्या उपस्थितीत यावेळी महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती विशेषांकाचे प्रकाशन वामन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय मुल निवासी महिला संघातर्फे ६० हजार रुपयांचा जनआंदोलनासाठी मिळालेला निधी चंदा मिसळे, कल्पना खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, प्रीती गवई, वनिता मोरे, रिया खोब्रागडे, अंजली गायकवाड, परी शंभरकर यांनी सुपुर्द केला.
याप्रसंगी निशा मेश्राम, भन्ते मेदनकर, प्रा. नाजूक धांदे, बापूराव रंगारी, वैभव बगमारे, मनोज झोपाटे, अजुबा भोसले, गणेश राऊत, अॅड. रमेश जुनघरे, रवी मुंदाने, ज्ञानेश्वर सोनटक्के, हाफिद आरिफ, सतीश उरकुडे, लक्ष्मण वानखडे, विनय बोरकर, राहुल तायडे, सुकलाल देशपांडे, नरेंद्र मुंदाने, नितीन खैरे, विनोद गोबरे, प्रदीप शेंदुरकर, संदीप चौधरी, प्रशांत ठाकरे, राहुल मिसळे, संभा मिसळे, रामा हिवराळे, वासुदेव शेंडे, अरविंद पाटील, विशाल गोंडाने यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक डॉ. अशोक खोब्रागडे, संचालन अशोक देशपांडे यांनी, तर आभार मौलवी रिजवान नदवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी भीम तरुण उत्साही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.