कोसदनीचे शेतकरी सोयाबीन, कापूस घेऊन धडकले तहसील कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 08:34 PM2019-10-29T20:34:47+5:302019-10-29T20:40:36+5:30

परतीच्या पावसाने झालेले नुकसान शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी या पावसामुळे पूर्णपणे गारद झाले.

The farmers of Kosadani were taken to the tehsil office with soybeans and cotton | कोसदनीचे शेतकरी सोयाबीन, कापूस घेऊन धडकले तहसील कार्यालयात

कोसदनीचे शेतकरी सोयाबीन, कापूस घेऊन धडकले तहसील कार्यालयात

Next

यवतमाळ - परतीच्या पावसाने झालेले नुकसान शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी या पावसामुळे पुर्णपणे गारद झाले. त्याचा सर्व्हे करून शासनाची मदत व्हावी म्हणुन आर्णी तालुक्यातील कोसदनी येथील शेतकरी पावसाने लागलेले सोयाबीन व कापुसाची झाडे घेऊन मंगळवारी सायंकाळी चार वाजता तहसील कार्यालयात  धडकले. आपल्या शेतातील परिस्थितीची व्यथा नायब तहसीलदार आर. ई. डेकाटे,  सहकारी शेखर लोळगे, श्रीकांत गिते यांच्या समोर मांडली.

यावेळी शेतकरी तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास ठाकरे, दिपक ठाकरे, उमेश ठाकरे, सुरेश ठाकरे, विशाल ठाकरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाऊन बुधवारी तातडीने तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी यांची बैठक घेऊन दोन दिवसात शेतसर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The farmers of Kosadani were taken to the tehsil office with soybeans and cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.