ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Published: April 5, 2017 12:22 AM2017-04-05T00:22:44+5:302017-04-05T00:22:44+5:30

गेल्या वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारी पीक लागवडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ज्वारीचे भाव गव्हापेक्षाही महागले आहे.

Farmers' move to cultivate sorghum | ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

Next

झरी : गेल्या वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारी पीक लागवडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ज्वारीचे भाव गव्हापेक्षाही महागले आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा मिळणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून आता काही प्रयोगशिल शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे कल दिला आहे.
तालुक्यातील कारेगाव, लिंबादेवी, माथार्जुन परिसरातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात जमीन रिकामी राहू नये, तिचा उपयोग व्हावा म्हणून पावसाळी व हिवाळी पीक निघाल्यानंतर ज्वारिची पेरणी केली आहे. तीचे संगोपनही केले असून ही ज्वारीची पिके बघण्यासारखी आहे. आज शेतकरी नगदी पिके घेण्याच्या मानसिकतेत असून ज्वारी ह्या पारंपारिक पिकाकडे साफ दुर्लक्ष्ौ झाले होते. परिणामी ज्वारीचे दरही मोठ्या प्रमाणात वधारले होते. कारण ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही हौशी शेतकरी ज्वारीची लागवड करून यातुन खाण्यासाठी ज्वारी व उर्वरित ज्वारी विकून पैसा तसेच जनावरांसाठी चाऱ्याचीही व्यवस्था होते. त्याचबरोबर कडबा विकून त्यातून पैशाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers' move to cultivate sorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.