शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:27 PM2018-12-26T21:27:13+5:302018-12-26T21:27:28+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Farmers movement | शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांचे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देकिसान सभा आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयात दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, ही मागणीही आंदोलकांनी यावेळी रेटून धरली. शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीची मदत आणि दीड लाख रुपयांची कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. त्यातच यावर्षीच्या दुष्काळाने भर घातली. जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळाने होरपळून निघालेले आहेत. असे असताना शासनाने केवळ नऊ तालुक्यात दुष्काळ घोषित केला.
कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. या पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, कपाशीच्या विम्याची पूर्ण रक्कम न देणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, शेतीला २४ तास वीज मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. दरम्यान आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी भेट दिली. आंदोलनात तुकाराम भस्मे, अनिल हेपट, अनिल घाटे, गुलाबराव उमरतकर, हिम्मतराव पाटमासे, राकेश अजनकर, दिलीप लांजेवार, वासुदेव गोहणे आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Farmers movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.