खताचे दर वाढल्याने मुळावा परिसरातील शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:16+5:302021-05-20T04:45:16+5:30
केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन ...
केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन दराने येत आहे. हे भाव दीडपट जादा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा दावा करणारे सर्व राजकीय पक्ष गुपचूप आहेत. शेतकरी पुत्र असलेले व्हाॅट्सॲपबहाद्दर (प्रत्येक विषयांवर टीका-टिप्पणी व वाद करणारे) यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत.
खत कंपन्यांनी एका बाजूला खताचे भाव वाढविले, दुसऱ्या बाजूला किरकोळ खत विक्रेत्यांचे कमिशन कमी केले. त्यातही त्यांना हमाली द्यावी लागेल. यामुळे त्यांना भांडवल जास्त लागेल व नफा कमी राहील. त्यामुळे ते शेतकऱ्यांकडूनच जास्तीचे पैसे घेतील. लिंकिंग करतील. प्रामाणिक असतील तर खताचा व्यवसाय करणार नाहीत. त्यांनी काहीही केले त्याचे नुकसान शेतकऱ्यांनाच होईल. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.