उटी येथील पोळ्यात वाढविला शेतकऱ्यांचा आत्मसन्मान
By admin | Published: September 3, 2016 12:37 AM2016-09-03T00:37:10+5:302016-09-03T00:37:10+5:30
उत्कृष्ट बैलजोडी जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून गौरविण्याची परंपरा उटी येथे यंदाही अनुभवायला मिळाली.
महागाव : उत्कृष्ट बैलजोडी जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून गौरविण्याची परंपरा उटी येथे यंदाही अनुभवायला मिळाली. वर्षभर शेतात राबराब राबून सर्जा-रार्जा बैलाशी प्रेमाच नातं सांगणाऱ्या बळीराज्याचाही योग्य सन्मान जपण्याची परंपरा उटी येथे प्रशांत गावंडे यांच्या पुढाकाराने पार पडली.
जयवंतराव गावंडे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने बैलाची निट काळजी घेणारे उत्तम मोरे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. बाबाराव ठाकरे यांनी दुसरा तर शिवाजी शिंदे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. बैलाची निटनेटकी सेवा त्यांची देखभाल करणाऱ्यांना शाल श्रीफळ आणि शिल्ड बक्षीस दिल्या जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांचा पोळ्याच्या दिवशीच नीळकंठराव गावंडे, डॉ. अवधूत गावंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळामामा वानखेडे, गणेश वानखेडे, विवेक गावंडे यांच्या हस्ते सत्कार केला.(शहर प्रतिनिधी)