शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:43 PM2019-11-04T23:43:37+5:302019-11-04T23:44:01+5:30
एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हा सहकार आघाडीने केली आहे.
एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.
यात शेतकऱ्यांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी विमा कंपनी व शासनाकडून सरसकट एक रकमी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार रूपेश खंडारे यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले.
निवेदन देताना भाजप जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन माने, नगरसेवक बाळासाहेब नाईक, भगवान गावंडे, बाळासाहेब शिंदे , गणेश वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.