सोयाबीन विक्रीसाठी शेतकºयांचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:25 PM2017-10-27T23:25:39+5:302017-10-27T23:25:50+5:30
गेल्या तीन दिवसांपासून शेकडो शेतकरी येथील बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी मुक्कामी आहेत. त्यांना शेतमालाच्या राखणीकरिता कुडकुडत्या थंडीत रात्र जागून काढावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून शेकडो शेतकरी येथील बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी मुक्कामी आहेत. त्यांना शेतमालाच्या राखणीकरिता कुडकुडत्या थंडीत रात्र जागून काढावी लागत आहे.
बाजार समितीमध्ये बुधवारी व गुरूवारी गोंधळ उडाला. व्यापाºयांनी शेतमालाची खरेदी थांबविल्याने शेतकºयांची पंचाईत झाली. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी गुरूवारी रस्ता रोको केला. त्यानंतर खरेदी सुरू झाली. मात्र दोन दिवस वाया गेल्याने सर्वसामान्य शेतकºयांना फटका बसला. त्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या यार्डातच ठाण मांडावे लागले. जवळपास २५० शेतकºयांनी अक्षरश: थंडीत कुडकुडत रात्र जागून काढली.
त्यातच हमी दरापेक्षा कमी दरात सोयाबीन खरेदी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हमीपत्र लिहून घेतले जात असल्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला.
भोजन, ब्लँकेटची व्यवस्था
मुक्कामी शेतकºयांकरिता बाजार समितीने गुरूवारी रात्री भोजन आणि ब्लँकेटची व्यवस्था केली. त्यामुळे शेतकºयांनी थोडे समाधान व्यक्त केले.