शेतकऱ्यांना विम्याचे ५० लाख मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 09:56 PM2018-01-07T21:56:25+5:302018-01-07T21:57:03+5:30
सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.
गेल्यावर्षी २०१७ मध्ये रबी पिकांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार ९०० शेतकऱ्यांनी पाच हजार १४२ हेक्टरचा पीक विमा उतरविला होता. त्यापोटी त्यांनी विमा कंपनीकडे १९ लाख ७९ हजार रूपयांचे प्रिमीयम भरले होते. गेल्यावर्षी रबी पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीने या सर्व शेतकऱ्यांना विमा दावा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना ५० लाखांची भरपाई दिली जाणार आहे.
संबंधित विमा कंपनी हा निधी शेतकऱ्यांचे बँक खाते असलेल्या बँककेकडे वळता करणार आहे. प्रत्यक्षात अद्याप तरी हा निदी बँकेकडे जमा झाला नाही. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच हजार २०४ हेक्टरवरील रबी पिकांचा विमा उतरविला. त्याकरिता त्यांनी विमा कंपनीकडे २४ लाखांचा प्रिमीयम जमा केला आहे. यात गहू आणि हरभरा पिकाला संरक्षित करण्यात आले आहे.