दिल्ली आंदोलन समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रात्र जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:01+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. ...

Farmers woke up at night in support of the Delhi agitation | दिल्ली आंदोलन समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रात्र जागली

दिल्ली आंदोलन समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रात्र जागली

Next
ठळक मुद्देआझाद मैदान : मेणबत्या लावून केंद्राचा निषेध

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्र शासनाच्या कायद्याविरोधात आवाज उठवित स्वाभिमानी शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारी रात्री ठिय्या आंदोलन केले. स्थानिक आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाला असंख्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. 
दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यवतमाळात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी संघटनेने जिल्ह्यात उद्‌भवलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रश्नावर प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, असे मतही मांडण्यात आले आहे. कृषीपंपासाठी दिवसा १२ तास वीज मिळावी, खरीप हंगामातील बोगस बियाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी प्रकरणात खासगी कंपन्यांकडून मदत मिळावी, राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील नऊ लाख हेक्टरवरील सर्व पिकांना सरसकट प्रधानमंत्री पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे जागर आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे जिल्हा नेते मनीष जाधव, अनुप चव्हाण, गजानन अमदाबादकर, सिकंदर शहा, युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड, महागाव तालुका अध्यक्ष मंगल राठोड यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. 
शेतकरी पुत्रांचा मोर्चा
शुक्रवारी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. स्थानिक आर्णी नाक्यावरून निघालेला हा मोर्चा थेट बसस्थानक चौकात पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांना मधातच रोखण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. 
काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांची कायद्यामुळे पिळवणूक होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलकांनी दिवसभर स्थानिक बसस्थानक चौकात ठिय्या दिला. 
यावेळी प्रा. प्रवीण देशमुख, किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, नगरसेवक चंदू चौधरी, उमेश इंगळे, अतुल राऊत, अरुण ठाकूर, घनश्याम अत्रे, सुरज खोब्रागडे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस तैनात होते. 
विविध समाज-संघटनांची     आज मोटरसायकल रॅली
 भारतीय पिछडा शोषित संघटन, मराठा सेवा संघ, सत्यशोधक स्टडी सर्कल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, गुरु रविदास विचारमंच स्मारक समिती, स्मृतीपर्व महिला समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जमाते इस्लामे हिंद, यवतमाळ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवारी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता संविधान चौकापासून प्रारंभ होणार आहे. महात्मा फुले चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे.

Web Title: Farmers woke up at night in support of the Delhi agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.