सोनखास परिसरात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:31 PM2018-04-05T21:31:23+5:302018-04-05T21:31:23+5:30

नेर तालुक्यातील सोनखास परिसरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे.

Fast water shortage in the Sakhkhas area | सोनखास परिसरात तीव्र पाणीटंचाई

सोनखास परिसरात तीव्र पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देटँकरची मागणी : महिलांची पाण्यासाठी पायपीट

पांडुरंग भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : नेर तालुक्यातील सोनखास परिसरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे.
परिसरातील सोनखास(हेटी) येथे मार्चच्या अखेरीस तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली. महिलांना पाण्यासाठी रात्रीअपरात्री भटकावे लागत आहे. तरीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. अतिरिक्त भारनियमनामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरात भारनियमनाच्या कहरामुळे पाणीटंचाईत भर पडली आहे.
अनियमित भारनियमनामुळे परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर विपरित परिणाम होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे. अनेक गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हातपंप, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. हेटी येथील महिलांना एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. काही नागरिकांनी आता बैलबंडीद्वारे पाणी आणणे सुरू केले आहे. परिसरातील उत्तरवाढोणा, हेटी, घुई, सोनवाढोणा, मालखेड आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांच्यानंतर नळ येत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. भारनियमनामुळे अल्प वेळासाठीच पाणी येत आहे. ग्रामपंचायती मात्र नागरिकांकडे पाणीकर थकीत असल्याचे सांगून हात वर करीत आहे. सोनखास येथील ग्रामसेवक वैशाली थूल यांनी पाणीटंचाई निवारणार्थ नेर पंचायत समितीकडे टँकर आणि विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.

Web Title: Fast water shortage in the Sakhkhas area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी