पांढरकवडा एसडीओ कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:37 PM2018-10-19T23:37:18+5:302018-10-19T23:38:28+5:30
वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी करूनही व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी करूनही व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
झरी तालुक्यातील सुर्ला, अनंतपूर व गोधणी येथील शेतकºयांची १९९७ मध्ये सुर्ला ते अनंतपूर-गोधणी या रस्त्यासाठी जमिन संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांपासून तर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांपर्यंत, आमदार, खासदारांकडेही तक्रारी केल्या. मात्र या शेतकºयांच्या मागण्यांची गंभीरपणे दखल घेतली नाही. सुर्ला व अनंतपूर हे गाव पेसाअंतर्गत येत असून हे शेतकरी २० वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहे.
जोपर्यंत शेतजमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. या उपोषणात दशरथ मेश्राम, गयाबाई कोडापे, मधुकर पवारकर, रंजीत तोडसामे, बंडू कोडापे, गुलाब मडावी, मारोती धोबे, जनार्दन धोबे, एकनाथ धोबे, जगन पाचभाई, मधुकर काकडे, बापूराव टेकाम, गंगाराम कुमरे, बबन पाचभाई, घागरू मंडाळी, दादाजी आडे आदींसह अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला.