कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:09 PM2019-07-18T22:09:07+5:302019-07-18T22:09:29+5:30

आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. प्रशासनाच्या या धोरणाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

The fatal travel of citizens from the outdated bus | कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

कालबाह्य बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

Next
ठळक मुद्देपांढरकवडा आगार : प्रवाशांना करावा लागतो असुविधेचा सामना, जुन्याच बसेसची केली जाते डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. प्रशासनाच्या या धोरणाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पांढरकवडा आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६० बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या नऊ गाड्या आहेत. देखभाल व दुरुस्तीसाठी आगारात ३९ मेकॅनिक आहेत, तर वाहक व चालक मिळून एकूण २४७ कर्मचारी सेवा देत आहेत. या आगारातून पुणे, अकोला, नागपूर, अमरावती आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेकवेळा या बस रस्त्यातच नादुस्त होत असल्याचे चालक-वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचेही हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असताना प्रवाशांना सुविधा देण्यास पांढरकवडा आगार कमी पडत आहे.
बहुतांश बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या, साईड ग्लास व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. आगाराकडे सध्या ६० बसेस आहेत. त्यापैकी पांढरकवडा आगारातील ८६००, ८६०८, ८२६९, ७१२१, ७१६९, ९३७२ क्रमांकाच्या बसगाड्यासह ३० बसेस १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्ती करून वापरल्या जात आहे. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांना अंगावर झेलावे लागत असल्याचे चित्रही पहायला मिळते.
पांढरकवडा येथे पाच वर्षात एकही नवीन बस नाही
प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत बसेसची संख्या तेवढीच आहे. विशेष म्हणजे आगाराला गेल्या पाच वर्षात एकही बस मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सद्यस्थितीत पांढरकवडा आगारात या आगारातील ६० बसेस आहेत. त्यापैकी १० बसेस नादुरूस्त आहेत. उपलब्ध बसेससुद्धा मार्गावर बंद पडत असल्याच्या घटना आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The fatal travel of citizens from the outdated bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.