यवतमाळ जिल्ह्यात १७००० उमेदवारांचे भाग्य आज ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 10:27 AM2021-01-15T10:27:41+5:302021-01-15T10:28:01+5:30
Yawatmal news राज्यभरातील ग्रामपंचायतीचे मतदान आज पार पडत आहे . यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची विशाल प्रक्रिया आज आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यभरातील ग्रामपंचायतीचे मतदान आज पार पडत आहे . यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची विशाल प्रक्रिया आज आहे . जिल्ह्यात ९२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या ८१०१ जागांसाठी १७ हजार ११७ उमेदवार रिंगणात उभे आहे . यामध्ये ८ हजार ८०१ महिला उमेदवार आहेत . या उमेदवारांना निवडून देण्यासाठी १२ लाख ३० हजार १६२ मतदार निवडणूक प्रक्रियेत भाग घेत आहे . प्रत्यक्षात मतदार राजा कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे . कोणाचा विजय होतो आणि कोणाचा पराभव याचा कौल येत्या १८ तारखेलाच कळेल.