भरधाव बोलेरो पुलाच्या कठड्यावर आदळली, पिता-पुत्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 02:42 PM2022-04-13T14:42:53+5:302022-04-13T14:44:12+5:30

ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनातील दोघेही जागीच ठार झाले.

father and son killed on the spot as Bolero pickup crash on to a bridge in nagpur hyderabad national highway | भरधाव बोलेरो पुलाच्या कठड्यावर आदळली, पिता-पुत्र जागीच ठार

भरधाव बोलेरो पुलाच्या कठड्यावर आदळली, पिता-पुत्र जागीच ठार

Next
ठळक मुद्देनागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धारणा गावाजवळील घटना

पांढरकवडा (यवतमाळ) : नागपूरहून हैदराबादकडे भरधाव जाणारी बोलेरो पिकअप गाडी पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धारणा गावानजीकच्या लहान पुलावर बुधवारी (दि. १३) सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान झाला.

विठ्ठल जंगम श्रीनिवास (२०) व जंगम श्यामसुंदर श्रीनिवास (५०) अशी मृतांची नावे असून, ते तेलंगणातील नरसम पेठ (जि. वारंगल) येथील रहिवासी आहेत. दोघे पिता-पुत्र काल मंगळवारी (टीएस २४, टी ९२६३) क्रमांकाच्या बोलेरो पिकअप गाडीने नरसम पेठ येथून मिरची भरून ती नागपूर येथे विकण्यासाठी गेले होते.

मिरची विकून नागपूरहून परत येत असताना मार्गात धारणा येथील उड्डाणपूल ओलांडून पुढे जात नाहीत, तोच लहान पुलाच्या कठड्याला भरधाव येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनातील दोघेही जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती करंजी वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर शहारे यांना मिळताच, ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी धारणा येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृतांना गाडीतून बाहेर काढले. मृतदेह पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे वाहन अनियंत्रित झाले असावे व हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: father and son killed on the spot as Bolero pickup crash on to a bridge in nagpur hyderabad national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.