वडील म्हणतात हुंडा पाहिजेच.. मुलगा म्हणतो, फक्त मुलगी द्या.. तर मुलगी म्हणते शिपाई चालेल पण शेतकरी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 07:38 PM2021-11-01T19:38:10+5:302021-11-01T19:38:39+5:30
Yawatmal News वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.
यवतमाळ : वर्षानुवर्ष मुलगीच न मिळाल्याने लग्नासाठी तळमळणारा एका टीव्ही मालिकेतील ह्यपत्रकार पोपटलालह्ण सर्वांना ठावुक आहे. मात्र वडीलधाऱ्या मंडळींच्या गडगंज हुंड्याच्या मागणीमळे समाजातील शेकडो लग्नाळू मुले कित्येक वर्षांपासून लग्नासाठी तळमळत आहेत. वयाची चाळीशी उलटल्यावरही लग्नाविना जगत आहेत.
जेवढे अधिक शिक्षण तेवढा अधिक हुंडा हे विचित्र समीकरण समाजात रूढ झाले आहे. त्यामुळे कायदा मोडून हुंडा दिला आणि घेतला जात आहे. मात्र गरीब घरातील उच्चशिक्षित मुला-मुलींचा खोळंबा होत आहे.
मुली म्हणतात, शेतकरी मुलगा नको गं बाई !
शेती हा हक्काचा व्यवसाय असला तरी सध्या तोट्यात चालला आहे. त्यामुळे कोणत्याही मुलीच्या वडिलांना आपला जावई केवळ शेतकरी असलेला चालत नाही. चपराशी असला तरी चालेल, पण शेतकरी मुलगा नकोच, अशी अट टाकली जात आहे.
कमी पगाराच्या मुलांची आणखी अडचण
मासिक ४० हजार हाती आले तरी सध्याच्या महागाईत घर चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे दहा-वीस हजारांची नोकरी करणा?्यांना लग्नासाठी मुली मिळणे अक्षरश: कठीण झाले आहे.
वयाची तिशी ओलांडली, हात पिवळे कधी होणार
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याकडे मुलींचा कल वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक शिक्षण घेताना वय वाढत आहे. ३०-३५ वषार्नंतर अशा मुलींना मुलगा मिळणे कठीण जात आहे.