भूजल संरक्षण करण्याची संधी हुकण्याची भीती

By admin | Published: June 1, 2016 12:15 AM2016-06-01T00:15:24+5:302016-06-01T00:15:24+5:30

शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल...

Fear of hiding opportunities for groundwater protection | भूजल संरक्षण करण्याची संधी हुकण्याची भीती

भूजल संरक्षण करण्याची संधी हुकण्याची भीती

Next

पुढाकाराचा अभाव : राळेगाव तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर हालचाली संथ
राळेगाव : शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल संवर्धनाची कामे सुरू होऊन लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यास यश येऊन आगामी पावसाळ्यात त्या-त्या क्षेत्रात पाणीसाठा वाढून भूजल पातळी वाढणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई संपून विविध स्रोतात उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेतीच्या सिंचनाकरिताही होऊ शकणार आहे. मात्र यासाठी तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकाराचा अभाव आहे. वेळीच सावध न झाल्यास भूजल संरक्षणाची संधी हुकण्याची भीती आहे.
उन्हाळ्याचे तीन महिने संपत येत असताना राळेगाव तालुक्यात शासकीय पातळीवर विशेषत: कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या पाच गावातील दहा कामे, जलशिवारची कामे, मागेल त्याला शेततळे या मोजक्या आणि लोकसहभागातून लोहारा येथे झालेल्या गाळ काढण्याच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कोणतीही दखलपात्र कामे सुरू झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेतल्यास जलसंग्रह होऊ शकेल. अन्यथा पाणी वाहून जावून पुढील काळात पाणीटंचाईसह विविध प्रश्नांना तोंड देण्याची वेळ येणार आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत वर्धा, रामगंगा नदी, दोन डझनावर नाले, डझनभर तलाव आटलेले आहेत. अनेक गावात विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी तळ गाठला आहे. हातपंपही त्याच मार्गावर आहे. भूजलपातळी २०० फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. काही ठिकाणी २५०-३०० फूट खोल बोअर करूनही पाणी लागत नाही. अशी विपरित परिस्थिती असताना त्यापासून बोध घेत जलसंधारण, जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण अद्यापपर्यंत तरी काही ठोस हालचाली झालेल्या दिसत नाही. शासकीय आदेश नाही, कोणी करावयाचे, खर्च कसा व कोठून करावयाचा यावरच हात टेकण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने आदेश दिल्यास जिल्हा परिषदेतील १२६ शाळा, ७३ ग्रामपंचायती, १२८ गावातील अंगणवाड्या, ३२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ पशुचिकित्सालये, पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती, पंचायत समिती कर्मचाऱ्यांची १५ निवासस्थाने, जिल्हा परिषद विश्रामगृह, पाणीपुरवठा विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकते. बहुतांश विभागाचा परिसर एक एकरापेक्षा अधिक विस्तीर्ण असल्याने वाहून जाणारे पाणी मुरविण्याचे नियोजन केले जाऊ शकते.
तालुक्यात शासनाची ५० हून अधिक कार्यालय आहे. तीन महाविद्यालये, १३ कनिष्ठ महाविद्यालये, महत्त्वाच्या मोठा परिसर व इमारती असलेल्या डझनावर सहकारी संस्था आहेत. इंग्रजी शाळा, सहकारी बँकेच्या शाखा आहेत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने जलसंवर्धनाचे व्रत स्वीकारल्यास भविष्यातील पाण्याचे संकट दूर-दूरपर्यंत टळू शकते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fear of hiding opportunities for groundwater protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.