पोळ््याच्या झडत्यांना प्रबोधनाची झालर

By admin | Published: September 2, 2016 02:33 AM2016-09-02T02:33:05+5:302016-09-02T02:33:05+5:30

पोळा आणि झडत्या यांच अतुट नातं. ग्रामीण कृषी संस्कृतिशी ऋणानुबंध सांगणाऱ्या पोळ््याला झडत्या म्हणण्याची परंपरा आहे.

The feathers of the shepherds | पोळ््याच्या झडत्यांना प्रबोधनाची झालर

पोळ््याच्या झडत्यांना प्रबोधनाची झालर

Next

पोळा उत्साहात : एक नमन कौडा पार्वती हर हर महादेव
प्रकाश सातघरे दिग्रस
पोळा आणि झडत्या यांच अतुट नातं. ग्रामीण कृषी संस्कृतिशी ऋणानुबंध सांगणाऱ्या पोळ््याला झडत्या म्हणण्याची परंपरा आहे. दिग्रस येथे गुरूवारी साजरा झालेल्या पोळ््याच्या झडत्यांना यंदा प्रबोधनाची झुल चढविली होती. एक नमन कौडा पार्वती हर हर बोलाच्या गजरात प्रबोधनाच्या झडत्या झडल्या.
विदर्भातील ग्रामीण भागातील पोळा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. परंतु गत काही दिवसांपासून तोरणाखालील बैलांची संख्या मात्र घटत आहे. परंतु ज्याच्या दारात बैल आहे तो पोळ््याच्या दिवशी आपल्या सर्जा-राजाला सजविल्याशिवाय राहात नाही. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तो बैलाला सजवून तोरणाखाली आणतो. यंदा तर तालुक्यात दोन दिवस पोळा साजरा करण्यात आला. मात्र दिग्रस शहरातील शिवाजी मैदानावर गुरूवारीच पोळा भरविण्यात आला.
या पोळ््यात विविध झडत्या झडल्या त्यात
‘सरपंच रे सरपंच आमच्या गावचा सरपंच, सरकारी योजनांच्या भरवशावर भागवतो आपल्या घरचा प्रपंच’ अशी झडती देण्यात आली. तसेच जनजागृतीपर झडत्याही देण्यात आल्या. गुटखा, रक्तदान यावरही झडत्या म्हणण्यात आल्या. यासोबतच पोळ््यातील प्रसिद्ध झडती ‘गणा रे गणा, गण गेला वरच्या राणा, वरच्या राणातून आणला गवताचा भारा तो टाकला हो पार्वती हारा, पार्वतीने दिली हस्ती ते हस्ती पाहून माझा बैल आला मस्ती आता तो खेळतो कुस्ती, एक नमन कौडा पार्वती हर हर बोला.’ कोणत्याही रुढी, परंपरा आणि वाईट गोष्टींना फाटा देण्यासाठी सण, उत्सवांचा उपयोग कसा करता येतो याचे उदाहरण म्हणजे पोळा हा सण होय. दिग्रस शहरात आज सर्वत्र उत्साहात पोळ्याचा सण साजरा करण्यात आला.

Web Title: The feathers of the shepherds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.