गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 09:24 PM2019-01-13T21:24:39+5:302019-01-13T21:41:49+5:30

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.

feeling sad over the decision taken - Dr. Rani Bung | गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

googlenewsNext
ठळक मुद्देसुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : वऱ्हाडी परंपरेमध्ये कार्यक्रमाला न बोलावलेल्या माणसाचेही मनापासून स्वागत केले जाते. संमेलनाच्या सुरुवातीला आमंत्रण नाकारल्याच्या घटनेमुळे खूप दु:ख झाले. गुंडप्रवृत्तीमुळे आयोजकांना हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.
‘वर्धेला विनोबा भावेंनी जय जगतचा नारा दिला. मराठीचा अभिमान बाळगणारे आपण मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि संमेलनात येण्यास इंग्रजी लेखिकेला नकार देतो, हा कोणता न्याय’, असा सवाल राणी बंग यांनी उपस्थित केला.
बंग म्हणाल्या, ‘शिक्षणाने शहाणपण येते, असे मला वाटत नाही. शिकलेले लोक महामूर्ख असतात, तर अशिक्षित लोक जास्त शहाणे असतात. आधुनिकता म्हणजे धिंगाणा, व्यसनाधीनता, वाटेल तसे वागणे, असे शिकलेल्याना वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. साजरे करणे ही आपली प्रवृत्ती बनली आहे. आपल्या वागण्याला उत्सवी रूप आले आहे. लग्नसोहळा खर्चिक करण्याची सवय आपल्याला लागली आहे. गरीब लोकही श्रीमंतांचे अनुकरण करतात. त्यामुळे समाज संस्कृती बिघडत चालली आहे. सौंदर्याला अमाप महत्व दिले जाते. सौंदर्य प्रसाधनांचे दुष्परिणाम अनेक जणी भोगत आहेत. तरीही, अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करताना दिसतात. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व द्यावे, हे तरुणाईला समजून सांगितले पाहिजे’. सना पंडित आणि डॉ. मोना चिमोटे यांनी बंग यांच्याशी संवाद साधला.

आदिवासी लोक जास्त सुसंस्कृत की आपण? असा मला नेहमी प्रश्न पडतो. आदिवासी लोकांमध्ये चोरी होत नाही, त्यांच्यात एकही भिकारी नाही, तेथील मुली, स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. सुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे.

प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही
साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला जाणार होता. मात्र, या कार्यक्रमाला राणी बंग वगळता इतर तिन्ही मान्यवर अनुपस्थित होते. त्यामुळे ‘प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही’ अशी भावना उपस्थितांमध्ये पहायला मिळाली.

Web Title: feeling sad over the decision taken - Dr. Rani Bung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.