एक कन्या पालकांचा केला सत्कार

By admin | Published: February 10, 2017 01:54 AM2017-02-10T01:54:44+5:302017-02-10T01:54:44+5:30

येथील जायन्टस ग्रुप आणि जायन्टस स्कूलने एक कन्या पालकांच्या सत्काराचा अभिनव उपक्रम राबविला.

Felicitated a girl's parents | एक कन्या पालकांचा केला सत्कार

एक कन्या पालकांचा केला सत्कार

Next

जॉयन्टस ग्रुपचा उपक्रम : दहावीतील ११ पालकांचे जगावेगळे प्रेरणादायी कार्य
यवतमाळ : येथील जायन्टस ग्रुप आणि जायन्टस स्कूलने एक कन्या पालकांच्या सत्काराचा अभिनव उपक्रम राबविला. यानिमित्त दहावीतील दहा मुलींचे आई-वडील आणि एका शिक्षक दाम्पत्याचा मंगलवस्त्र आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
काही लोकांमध्ये आजही मुली होऊच न देण्याची विचित्र मानसिकता असते. अशा वेळी एकाच मुलीनंतर पूर्णविराम घेण्याचे आणि मुलीचेच संगोपन मुलाप्रमाणे करण्याचे जगावेगळे कर्तृत्व दाखविणाऱ्या या ११ पालकांचा सत्कार जायन्टसने केला. प्राचार्य डॉ.अनुपमा डोंगरे, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, जायन्टस स्कूल समितीचे अध्यक्ष सीए प्रकाश चोपडा, सचिव अनिरुद्ध पांडे, प्रशासकीय अधिकारी किशोर देशपांडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या वूडबॉल चमूचे नेतृत्व करणाऱ्या भूषण राजपूत या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. विशाखा कोकांडे, अश्विनी बेलूरकर, नितीशा लोखंडे, तन्वी देशमुख, प्राची सवाने, सांची मेश्राम, पृथ्वी कांबळे, संस्कृती ढाले, वैष्णवी निर्माळे, जागृती बेंदरे, ऋतुजा अजमिरे व हिमानी जोशी या कन्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. रमेश छेडा, मुकुंद औदार्य, डॉ.सुरेंद्र पद्मावार, सुभाष जैन, गुरूबक्ष आहुजा, चंद्रकांत लष्करी, ब्रिजमोहन भरतीया, गोपाल पोद्दार, टिकमचंद सिंघानिया, विनायक कशाळकर, ओमप्रकाश सिंघानिया, राजकुमार अग्रवाल या मान्यवरांच्या हस्ते एक कन्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संजूला केशरवाणी, मृणाल सिरसुधे, सृष्टी जवळकर, सिमरन रहांगडाले आदींसह सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated a girl's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.