न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

By admin | Published: July 6, 2017 12:40 AM2017-07-06T00:40:36+5:302017-07-06T00:40:36+5:30

जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटन गट क तर्फे सेवापूर्ती सोहळा, गुणवंत विद्यार्थी व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल

Felicitation ceremony of court employees | न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटन गट क तर्फे सेवापूर्ती सोहळा, गुणवंत विद्यार्थी व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि रक्तदात्यांना विमा पॉलिसीचे वितरण कार्यक्रम येथे घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे होते.
यावेळी सहायक अधीक्षक व्ही.के. लोंढे, लिपिक आर.ए. घुले, डी.ए. निमसरकर, बांधणीकार जी.ए. जिरापुरे यांचा सत्कार करण्यात आला. सहायक अधीक्षक बाळासाहेब नवघरे, लिपीक गणेश भोयर यांना विशेष सेवा पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. २० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.सी. मोरे, जिल्हा न्यायाधीश ए.टी. वानखडे, पी.एस. खुने, दिवाणी न्यायाधीश एस.एन. राजुरकर, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष जावेद अली, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष किशोर जाधव, गट क संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले आदींनी विचार मांडले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र धात्रक आदी मंचावर होते.
या कार्यक्रमात दहावीतील गुणवंत दक्षता कुऱ्हाडे, नंदिनी दिघाडे, जय ठाकरे, गौरी भोयर, श्रेयश चव्हाण, गुणरत्न बोरकर, प्रांजली बुटले, राधिका गायकवाड, भाग्यश्री राळे, पलाश डोईजड, कांचन गौतम, हिमांशू माटे, चैतन्य मुने, आदेश धलवार, बारावीतील गुणवंत वैभवी शेटे, पूजा खत्री, श्वेता बुटले, प्रतीक्षा बाडे, अस्मा परवीन मो.शकील, तंत्रनिकेतनची गुणवंत मयुरी ठाकरे, लघुलेखन परीक्षेतील गुणवंत अक्षय भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
संचालन कोर्ट मॅनेजर व्ही.एस. वानखेडे यांनी तर आभार अरुण खंडारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रशांत देशमुख, मो.शफी, पी.बी. माकडे, आर.एस. संभे, विनोद चव्हाण, गजेंद्र अंबाडकर, गजानन घटे, राजू भामकर, येळमे, विश्वास चेडे, सुरळकर, करांगळे, प्रफुल्ल गुल्हाने, यू.पी. रोम, ए.एस. रायकुंवर, माहीतकर, के.एस. दळवी, ए.एस. ठाकरे, ताई दरणे, जे.सी. बुराडे, पी.डी. पाटील, एस.आर. चौधरी, पी.आर. गुल्हाने, योगिराज थूल, कादर, श्रीरामे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Felicitation ceremony of court employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.