विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजतर्फे न्यायमूर्तींचा सत्कार, पुस्तके वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:24 PM2018-09-24T21:24:11+5:302018-09-24T21:24:35+5:30
विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे अध्यक्षस्थानी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे विदर्भ अध्यक्ष महेंद्र दर्डा, सकल जैन समाजाचे अॅड. अमरचंद दर्डा, अॅड. रवीशेखर बदनोरे, श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाचे अध्यक्ष प्रसन्न दफ्तरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण करण्यात आले. आणखी एक हजार विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयांच्या माध्यमातून पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष महेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविक केले. संचालन अॅड. संजय कोचर यांनी, तर आभार आनंद दर्डा यांनी मानले. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीज आणि महावीर ट्रस्टला स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.