सहकारमहर्षी शंकरराव राठोड यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:35 PM2018-05-08T22:35:26+5:302018-05-08T22:35:26+5:30
येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजयाताई घुईखेडकर, विमलताई राठोड, जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते श्रीधर मोहोड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, संचालक मनीष पाटील, प्रफुल्ल मानकर, बाबू पाटीलजैत, बाबू पाटील वानखडे, संजय जोशी, चवरे, जीवन पाटील, अॅड.आशिष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संजय राठोड यांनी अॅड.शंकरराव राठोड यांचे विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता, अशी अॅड.राठोड यांची ‘इमेज’ असल्याचे सांगितले. ठाकरे यांनी १९८५ मधील विधानसभा निवडणुकीच्या जुन्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात मधुकरराव खोडे महाराज यांनी सामाजिक कार्याचा वारसा अॅड.राठोड यांना कुटुंबातूनच लाभल्याचे सांगितले. यावेळी अॅड.मोघे, आमदार ख्वाजा बेग, सदाशिवराव ठाकरे, प्रकाश देवसरकर, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, उत्तमराव शेळके आदींनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन कैलास राऊत, प्रास्ताविक डॉ.टी.सी.राठोड, तर आभार वसंत घुईखेडकर यांनी मानले. नागरी सत्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.