महिलांची नगरपरिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:42 PM2018-05-31T23:42:33+5:302018-05-31T23:42:33+5:30

भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येथील वाघाडी परिसरातील महिलांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाण्याची मागणी लावून धरली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या दूर घर कशाला बांधले असे म्हणत, पाणी प्रश्नावर आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप महिलांनी केला.

Femdom shot on women council | महिलांची नगरपरिषदेवर धडक

महिलांची नगरपरिषदेवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देभीषण पाणीटंचाईच्या झळा : यवतमाळच्या मुख्याधिकाऱ्यांनी झटकली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येथील वाघाडी परिसरातील महिलांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाण्याची मागणी लावून धरली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या दूर घर कशाला बांधले असे म्हणत, पाणी प्रश्नावर आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप महिलांनी केला.
संपूर्ण शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वडगाव विभागात येणाऱ्या वाघाडी सेवादासनगर आणि जयमातादीनगरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी १० रूपये गुंडाप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कुठल्याही उपाय योजना केल्या नाही. याप्रश्नावर नगरपरिषदेला जाब विचारण्यासाठी गुरुवारी या भागातील महिला नगरपरिषदेत धडकल्या. मात्र त्या ठिकाणी त्यांची अवहेलनाच करण्यात आली. तीव्र आंदोलनाचा इशारा या महिलांनी दिला. यावेळी गंगा गायकवाड, सविता राऊत, अनिता खुणकर, ललिता सावळे, अनिता जाधव, ज्योती शेळके, प्रभा भालेराव, ज्योती पवार, प्रमिला जिरे, छाया जिरे, लता काळे, अर्चना चव्हाण, माला पवार, उषा फुलारे, रुख्मा जाधव, वंदना राठोड, संगीता राठोड, रुख्मा शेळके, इंदिरा जिरेकार, रुख्मा जाधव, योगीता पवार यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Femdom shot on women council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.