भरधाव बसने चार वाहने उडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 09:56 PM2019-01-29T21:56:28+5:302019-01-29T21:57:05+5:30
पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुंज : पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला.
पुसदकडून येणाऱ्या बसने महागावकडून येणाऱ्या आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२६/ए.सी.३००५) धडक दिली. दुसºयाच क्षणी मागोमाग आलेल्या दोन दुचाकींनाही (क्र.एम.एच.२९/बी.एच.११५० आणि एम.एच.२९/ए.व्ही.८९४७) उडवले. हा थरार संपत नाही तोच आणखी एका आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२९/बी.डी. ००२७) धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व आॅटोरिक्षामधील प्रवासी असे ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये गजानन सुभाष चव्हाण (२८) रा.पुसद, प्रवीण सुर्वे (२८) रा.वरूड, केशव किसन गवस (५५) रा.बोरी ई., कैलास केशव आडे (३०) रा.गुंज, भीवा पुरी (३३) रा.गुंज, दिगांबर पुरी (३५) रा.गुंज, देवानंद पुरी (१२) रा.गुंज, नीलेश चिप्रजवार (३०) रा.दिग्रस, शंकर विठ्ठल पुरी (६०) रा.गुंज आदींचा समावेश आहे.
जखमींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुसद उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या बसचालकाचे नाव बादल राठोड असून तो पुसद आगाराचा कर्मचारी असल्याचे कळते. महागावचे पोलीस उपनिरीक्षक कैलास भगत घटनास्थळी पोहोचले. या अपघाताबाबत महागाव पोलीस अधिक तपास करीत आहे.