दारव्हा येथे आंदोलनाचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:49 PM2020-02-16T23:49:51+5:302020-02-16T23:50:51+5:30

१२ फेब्रुवारीला सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याविरुद्ध महिलांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर जुना दिग्रस मार्गावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन सलग सुरू असून या आंदोलनाला अनेक जण भेटी देत आहे.

The fifth day of the agitation in Darva | दारव्हा येथे आंदोलनाचा पाचवा दिवस

दारव्हा येथे आंदोलनाचा पाचवा दिवस

Next
ठळक मुद्देसीएए, एनपीआर व एनआरसीला विरोध : कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील महिलांच्यावतीने सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरुद्ध १२ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. दरम्यान या आंदोलनाला अनेकांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
१२ फेब्रुवारीला सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याविरुद्ध महिलांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर जुना दिग्रस मार्गावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन सलग सुरू असून या आंदोलनाला अनेक जण भेटी देत आहे.
शुक्रवारला मुंबई येथील रविकांत वारपे, आर्णी येथील समीना शेख यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले. नागरिकत्व सुधारणा कायदा केवळ मुस्लीमविरोधी नसून त्याची झळ इतरानासुद्धा बसणार असल्याचे मत रविकांत वारपे यांनी व्यक्त केले. सरकार या कायद्याचा आधार घेऊन जाती-जातीत तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शनिवारी दिल्ली येथील अली शोहराब व दिलनवाज हुसैन यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकार समाजमनात भीती निर्माण करून द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकारमधील नेत्यांचे या कायद्याबाबत परस्परविरोधी विधाने येत आहे. त्यामुळे त्यांना तरी या कायद्याची परिभाषा कळली की नाही अशी शंका वरील नेत्यांनी व्यक्त केली.

Web Title: The fifth day of the agitation in Darva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.