यवतमाळ पंचायत समितीत भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:25 PM2020-01-08T15:25:48+5:302020-01-08T15:27:30+5:30
यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना ४, भाजप २, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
यवतमाळ: बुधवारी यवतमाळपंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती पदाच्या निवडीवरून भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी मारहाण व धक्काबुक्की झाली.
यवतमाळ पंचायत समितीमध्येशिवसेना ४, भाजप २, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीचा सदस्य भाजपसोबत होता. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेतील एका महिलेला आपल्या पाठिंब्यासाठी तयार केले. बुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भाजपचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ व रेटारेटी झाली.
तत्काळ यवतमाळ शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर झालेल्या निवडणुकीत सभापती पद शिवसेनेकडे तर उपसभापती पद काँग्रेसकडे राहिले. भाजपची तोडफोडीची खेळी अखेर व्यर्थ ठरली. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहून सेनेच्या त्या महिला सदस्याला भोवळ आली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.