‘झेडपी’ सभापती पदांसाठी फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:05 PM2019-06-05T22:05:58+5:302019-06-05T22:06:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर अविश्वास ठराव पारित झाल्याने ही पदे रिक्त झाली. या पदांवर ...

Filing for 'ZP' Chairman posts | ‘झेडपी’ सभापती पदांसाठी फिल्डींग

‘झेडपी’ सभापती पदांसाठी फिल्डींग

Next
ठळक मुद्देदोन पदे : शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि भाजप सदस्यांमध्ये चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर अविश्वास ठराव पारित झाल्याने ही पदे रिक्त झाली. या पदांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बांधकाम सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावर ३ मे रोजी अविश्वास ठराव पारित झाला. या दोघांनी उच्च न्यायालयातून त्यावर स्थगनादेश मिळविला. मात्र शिवसेना गटनेत्यांनी दाखल केलेल्या आक्षेपावरून नुकताच हा स्थगनादेश हटविण्यात आला. आता ही दोन्ही पदे रिक्त झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांच्या सत्ता काळात ही दोन पदे अनुक्रमे राष्ट्रवादी व अपक्षाकडे होती. आता राष्ट्रवादीनेच अविश्वासासाठी सहकार्य केल्याने बांधकाम सभापतीपदावर राकाँचे सदस्य दावा ठोकत आहे. दुसरीकडे आतापर्यंत सत्तेतून बाहेर असलेल्या शिवसेनेसोबत भाजपची युती झाल्याने भाजपचाही यापदावर डोळा आहे. मात्र या घडामोडीत सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेलाही दोन्ही पदांची अपेक्षा आहे. किमान एक पद मिळण्याची शिवसेनेला खात्री आहे. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. हे सदस्य पद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे.

Web Title: Filing for 'ZP' Chairman posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.