अखेर कमलाबाईवर अंत्यसंस्कार
By Admin | Published: May 19, 2017 01:50 AM2017-05-19T01:50:13+5:302017-05-19T01:50:13+5:30
एकुलत्या एका लेकीने व जावयाने झीडकारलेल्या कमलाबाईच्या पार्थिवावर अखेर गुरूवारी येथील मोक्षधामात
जावई, लेक दूरच : यवतमाळच्या समाज संघटनेने घेतली जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एकुलत्या एका लेकीने व जावयाने झीडकारलेल्या कमलाबाईच्या पार्थिवावर अखेर गुरूवारी येथील मोक्षधामात रितीरिवाजानुसार कलार समाज संघटनेने अंत्यसंस्कार केले.
कळंब तालुक्यातील सावरगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या कमलाबाईला एकुलती एक लेक. शिक्षक मुलगा बघून कमलाबाई व नानाजीने तिचा विवाह केला. वृद्धापकाळात नानाजी व कमलाबाई लेकीकडे राहायला गेले. काही वर्षांनी नानाजीचे निधन झाले. या दरम्यान जावई व लेकीने त्यांची २० एकर शेती विकून खाल्ली. त्यामुळे बेवारस स्थितीत नानाजीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. नंतर कमलाबाईच्या नशिबी तोच भोग आला. जावई व लेकीने तिला घराबाहेर काढले.
यावेळी तिला राळेगावच्या एका सुज्ञ नागरिकाने आश्रय दिला. दरम्यान, वृद्धापकाळामुळे कमलाबाईची प्रकृती खालावली. त्या सुज्ञ व्यक्तीने तिला येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी तिचा मृत्यू झाला. मात्र तिचे पार्थिव घेण्यासाठी लेक फिरकलीच नाही. ही करूण कहाणी गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच कलार समाज सघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रूग्णालयात पोहोचले. त्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली.

कलाबाईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी राळेगावचे अरविंद वाढोणकर, बाळासाहेब कविश्वर यांनी तिच्या मृतदेहाची मागणी पोलीस आणि रूग्णालय प्रशासनानकडे केली. त्यांनी हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला होता. मात्र कलार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतल्याने मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. अखेर समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले.