अखेर पोलीस शिपायाविरूध्द गुन्हा
By admin | Published: June 9, 2014 12:08 AM2014-06-09T00:08:18+5:302014-06-09T00:08:18+5:30
एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला
यवतमाळ : एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. खात्याची इभ्रत वेशीवर टांगणार्या या शिपायाला लवकरच निलंबित केले जाणार असल्याची माहिती आहे.
राम प्रल्हाद सोळंके (२५) रा. पोलीस मुख्यालय वसाहत असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मूळचा अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील रहिवासी असलेला राम सोळंके हा चार्ली कमांडो पथकात कार्यरत होता. ६ जुनला रात्री ८.३0 वाजता तहसील चौकातून मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जिल्हा कारागृहाच्या आवारातील सहकार्याचे नावे असलेल्या शासकीय निवासस्थानात नेवून तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर अत्याचार केल्यानंतर शनिवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास तिला घराजवळ सोडून दिले. घरी पोहोचताच तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पिडीत मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सुरूवातीला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र पिडीत मुलगी काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती. त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून तत्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यावरून पिडीत मुलीची येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस शिपायी राम सोळंके याच्याविरूध्द भादंवि ३७६ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अटकही केली. त्याला येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासासाठी त्याला चार दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. कुठलाही शासकीय अधिकारी-कर्मचारी एखाद्या गुन्ह्यात २४ तासापेक्षा जास्त कालावधीत कोठडीत असेल तर त्याला निलंबित करण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे त्याच्या निलंबन आदेशही काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)