...अखेर पहापळ आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:32+5:302021-08-26T04:44:32+5:30
पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अतिशय जुनाट झालेली (क्र. एम.एच.२९-९५०१)ची रुग्णवाहिका होती. सन २००४ मध्ये आलेली ही रुग्णवाहिका दोन ...
पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अतिशय जुनाट झालेली (क्र. एम.एच.२९-९५०१)ची रुग्णवाहिका होती. सन २००४ मध्ये आलेली ही रुग्णवाहिका दोन लाख किलोमीटरच्यावर धावली. त्यामुळे सदर रुग्णवाहिकेमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. रुग्णांना खासगी वाहनांतून जीव मुठीत धरून रुग्णालयात जावे लागत होते. याविषयावर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने पहापळ येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल वऱ्हाडे यांनी शासनाकडे नवीन रुग्णवाहिकेकरीता वारंवार निवेदने दिले होते. यासोबतच पहापळ सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य सुरचिता पाटील यांनीसुद्धा राहुल वऱ्हाडे यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा शसनाकडे केला होता. पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका न मिळाल्यास राहुल वऱ्हाडे यांनी उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला होता. अखेर शासनाने राहुल वऱ्हाडे यांच्या मागणीची दखल घेत, आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मंजूर केली असून जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कार्यालयामार्फत सदर माहीती देण्यात आली. आता पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील रुग्णांच्या सेवेत नवीन रुग्णवाहिका दाखल होत आहे.