अखेर भाजी मंडी हटविली

By admin | Published: January 20, 2016 03:37 AM2016-01-20T03:37:02+5:302016-01-20T03:37:02+5:30

येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा

Finally, the vegetable market was removed | अखेर भाजी मंडी हटविली

अखेर भाजी मंडी हटविली

Next

यवतमाळ : येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा केला. मात्र पर्यायी जागेवर कुठल्याच सुविधा नसल्याने ठोक भाजी विक्रेते संपावर गेले आहे. त्यामुळे मंगळवारी भाज्यांचा लिलावच झाला नाही. याचा फटका शहरातील ३६०० भाजी विक्रेत्यांना बसला.
यवतमाळच्या आठवडी बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून पहाटे भाज्यांचा लिलाव होतो. आता या ठिकाणी नगर परिषद व्यापारी संकुल उभारणार आहे. त्यासाठी ही भाजी मंडी उचलण्याची सूचना व्यापाऱ्यांंना देण्यात आली. त्यावेळी भाजी व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी केली. त्यांंना विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत जागा देण्यात आली. मात्र या जागेवर कोणत्याही सुविधा नसल्याने भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. तसेच सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला. तर दुसरीकडे प्रशासनाने सोमवारपर्यंत आठवडी बाजारातील दुकाने हटविण्याची मुदत दिली होती.
सोमवारी भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु हा मुद्दा नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आता कोणताही उपाय नाही म्हणून व्यापाऱ्यांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढणे सुरू केले. मंगळवारी सुमारे ४५ दुकाने हटविण्यात आली. दुसरीकडे नगर परिषद प्रशासनानेही येथील अतिक्रमण हटविण्याची जोरदार तयारी चालविली होती. परंतु स्वत:हूनच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढल्याने नगर परिषदेला काही करावे लागले नाही.
दरम्यान ठोक भाजी विक्रेत्यांच्या संपाचा परिणाम सोमवारी मंडी बंद असल्याने दिसला नाही. परंतु मंगळवारी भाजी बाजारात लिलावच झाला नाही. जिल्हाभरातून शेतकरी आपला भाजीपाला मंडीत घेऊन आले होते.
परंतु व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला. दुसरीकडे शहरातील चिल्लर विक्रेते भाजी खरेदीसाठी आले होते. त्यांनाही भाजी मिळाली नाही. शहरात आज कुठेच भाजी मिळाली नाही. याचा फटका ग्राहकांनाही बसला. (शहर वार्ताहर)

४यवतमाळच्या भाजी बाजारात यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, अकोला, अमरावती, कारंजा, खामगाव आणि मध्य प्रदेशातून दररोज १०० टन भाजीपाला येतो. त्यातून दर दिवसाला १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. या संपाने ही उलाढाल ठप्प झाली आहे.
अनेकांचा रोजगार बुडाला
४ठोक भाजी मंडीवर ३६०० व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यात तीन हजार हॉकर्स, दोनशे रिक्षा चालक, १०० आॅटोरिक्षा, २०० हमाल आणि १०० व्यापारी व दलालांचा समावेश आहे. त्यांचा उदरनिर्वाह यावरच चालतो. परंतु भाजी मंडीच्या संपाने या सर्वांचा रोजगार बुडाला.

Web Title: Finally, the vegetable market was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.