अखेर वणीकरांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:28 PM2018-03-18T23:28:12+5:302018-03-18T23:28:12+5:30

गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

Finally, the water bottle of the Waniqar was released | अखेर वणीकरांचा पाणीप्रश्न सुटला

अखेर वणीकरांचा पाणीप्रश्न सुटला

Next
ठळक मुद्देवर्धा नदीचे जलपूजन : पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. रविवारी दुपारी पाटळा गावाजवळील वर्धा नदीच्या तिरावर नदीचे जलपूजन करण्यात आले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नदीचे जलपूजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अशोक सूर, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, तहसीलदार रवींद्र जोगी, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जयंत सोनटक्के यांनी केले, तर आभार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी मानले. गेल्या दोन दशकापासून वणीतील पाणी प्रश्न सतत पेटत होता. यावर उपाययोजना म्हणून टँकर व ट्युबवेलही खोदण्यात आल्या होत्या. तरीही दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. मात्र आता या वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे वणीकरांची तहान भागणार आहे, तसेच नदी पात्रात बंधारा बांधण्यात येणार असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागा दान देणाऱ्या बोबडे कुटुंबियातील पुरूषोत्तम, देवराव, संजय व श्रीकांत या चारही भावंडांचा हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Finally, the water bottle of the Waniqar was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.