४० हजार महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:38+5:30

गरोदर मातांसाठी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृवंदन योजना जाहीर करण्यात आली. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गत दोन वर्षामध्ये या योजनेमध्ये ५१ हजार ३८५ महिलांची नोंद करण्यात आली. यातील ४० हजार २९५ महिला मदतीस पात्र ठरल्या आहेत. ३६ हजार ८८० महिलांच्या खात्यात हा निधी वळता झाला आहे. या गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा करते.

Financial assistance for delivery to 40,000 women | ४० हजार महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत

४० हजार महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षित मातृत्वाला मिळाला आधार : लॉकडाऊन काळात बुडीत मजुरीने तारले

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृवंदन योजना हाती घेण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ४० हजार महिलांची प्रसूती झाली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात ही मदत मोलाची ठरली आहे.
गरोदर मातांसाठी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृवंदन योजना जाहीर करण्यात आली. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गत दोन वर्षामध्ये या योजनेमध्ये ५१ हजार ३८५ महिलांची नोंद करण्यात आली. यातील ४० हजार २९५ महिला मदतीस पात्र ठरल्या आहेत. ३६ हजार ८८० महिलांच्या खात्यात हा निधी वळता झाला आहे. या गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा करते. यामध्ये पहिल्या टप्प्यात गरोदर असल्याची नोंद करताच आरोग्य विभाग गरोदर मातांना हजार रूपये अदा करते. दुसऱ्या टप्प्यात गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी गरजेची आहे. अशी तपासणी झाल्यानंतर गरोदर मातांना दोन हजार रूपयांचा निधी दिला जातो. तर तिसऱ्या टप्प्यात प्रसूतीनंतर लसीकरण केल्यावर दोन हजाराचा अखेरचा टप्पा दिला जातो.

गरोदर मातांनी प्रसूतीसाठी आशा अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी करावी लागते. या योजनेत सर्वच स्तरातील महिलांचा सहभाग वाढत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात मोहीम राबविली जात आहे.
- पौर्णिमा गजभिये, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, प्रधानमंत्री मातृवंदन योजना

लॉकडाऊनमध्ये मोलाचा आधार
कोरोना काळात मजुरीच नसल्याने अनेक कुटुंब अडचणीत होते. अशा स्थितीत प्रसूतीमुळे कुटुंबीय चिंतेत होते. मातृवंदन योजनेमुळे प्रसूतीसाठी निधी मिळाला आणि कुटुंबाचा आर्थिक अडसर दूर झाला आहे.

बाळाचा मृत्यू झाला तर मदत थांबणार
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत प्रसूती झाल्यावर दोन हजाराचा हप्ता दिला जातो. मात्र या प्रसूतीत बाळ दगावले तर हा निधी मिळत नाही. दुसºया अपत्याच्या वेळी तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार मिळतात.

Web Title: Financial assistance for delivery to 40,000 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.