यवतमाळ जिल्ह्यातील घोन्सा येथे ऑटोमोबाईल दुकानाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 03:37 PM2020-01-06T15:37:38+5:302020-01-06T15:38:05+5:30
वणी तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईल दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत 7 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: वणी तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईल दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत 7 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले.
घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी गावकऱ्यांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनना फोनद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले.