शेतात लागलेल्या आगीत घर अन् गोठा भस्मसात, पाळीव प्राणीही मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 11:00 PM2020-12-28T23:00:17+5:302020-12-28T23:00:52+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीच्या तडाख्यात पाळीव प्राणी, सहा लहान बकर्या, कोंबड्या मृत्युमुखी पडले आहेत.
यवतमाळ - मुडाणा (महागाव) : येथील भिमराव बाळाजी पाईकराव यांच्या शेतातील घराला आग लागली. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने घर आगीत भस्मसात झाले. कोंबड्या, बकऱ्या असे पाळीव प्राणी होते. खाण्याचे अन्नधान्य, ६ शेळ्याचे पिल्ले, ५० कोंबड्या, रोख रक्कम ३५ हजार रूपये आगीत भस्मसात झाले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीच्या तडाख्यात पाळीव प्राणी, सहा लहान बकर्या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.