लोखंडी पुलावरील दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:43 PM2018-10-05T23:43:02+5:302018-10-05T23:43:22+5:30
स्थानिक लोखंडी पुल परिसरात हार्डवेअर दुकानाला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. दुकानालगतच बांबू व्यावसायिकांचा माल मोठ्या प्रमाणात होता. अगिशमन यंत्रणा तत्काळ पोहोचल्याने बांबू विक्रेत्यांचे नुकसान टळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक लोखंडी पुल परिसरात हार्डवेअर दुकानाला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. दुकानालगतच बांबू व्यावसायिकांचा माल मोठ्या प्रमाणात होता. अगिशमन यंत्रणा तत्काळ पोहोचल्याने बांबू विक्रेत्यांचे नुकसान टळले.
येथील सुलभेवार मार्केटमधील दुकान क्रमांक ६८ मध्ये शुक्रवारी एमआर हार्डवेअरला आग लागली. यामध्ये २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदार रफिकभाई यांनी पोलिसांना दिली. दुकानातील महागडे फोम, हार्डवेअर, पेंट, कपडा, पीएलबी मटेरियल जळून खाक झाले. या भागाच्या नगरसेविका शुभांगी हादगावकर यांनी अग्निशमन यंत्रणेला तत्काळ पाचारण केले. यामुळे आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.