म्युझिक सेंटरला आग, २२ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 11:39 PM2018-01-04T23:39:17+5:302018-01-04T23:40:07+5:30
येथील बसस्थानक परिसरातील म्युझिक सेंटरला सोमवारी मध्यरात्री आग लागली. यात तब्बल २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस पंचनाम्यात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बसस्थानक परिसरातील म्युझिक सेंटरला सोमवारी मध्यरात्री आग लागली. यात तब्बल २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस पंचनाम्यात म्हटले आहे.
या प्रकरणी दुकानमालक सैयद सिकंदर सैयद मुकंदर (३१) रा. पोबारु लेआउट यवतमाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, नागपूर रोडवरील जेलगार्डनजवळ त्यांचे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स म्युझिक सेंटर हे दुकान आहे. १ जानेवारीला मध्यरात्री नंतर शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली. दुकानातील सर्व साहित्य जळून २२ लाखांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या दिवशी सहायक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यात १८ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ४ लाखांचे फर्निचर जळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दुकान मालक सैयद सिकंदर सैयद मुकंदर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. दुकान पूर्णत: जळून खाक झाल्यामुळे आता आपल्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे शासनाकडून मदत मिळवून द्यावी, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.