दारव्हा एमआयडीसीत स्पिनिंग फॅक्टरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:43 PM2019-04-26T21:43:21+5:302019-04-26T21:43:51+5:30

येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते.

Fire at spinning factory in Darwha MIDC | दारव्हा एमआयडीसीत स्पिनिंग फॅक्टरीला आग

दारव्हा एमआयडीसीत स्पिनिंग फॅक्टरीला आग

Next
ठळक मुद्देठिणगी उडाली : एक कोटीचे साहित्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
येथील यवतमाळ मार्गावरील एमआयडीसी परिसरात चिंध्यापासून कापूस तयार करणारी रमेश ठक्कर, पीयूष डोमडिया यांच्या मालकीची मेमाई स्पिंनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. पाहता-पाहता आग संपूर्ण फॅक्टरीत पसरली. घटनेची माहिती मिळताच दारव्हा, दिग्रस, नेर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण फॅक्टरीमध्ये या आग पसरल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुद्धा आग आटोक्यात आली नव्हती.
या आगीत ४५० पक्की गठाण, ३५० कच्ची गठाण, प्रेस, स्पिंनिंग मशीन, एअर प्रेशर पंप, पीएफ पॅनल, कंट्रोल पॅनल, १५० टीनपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे यासह इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. आगीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

Web Title: Fire at spinning factory in Darwha MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग